उद्या माधवबाग तर्फे 'कोरोना संसर्गाबाबत घ्यावयाची काळजी' याविषयावर ऑनलाइन कार्यशाळा
बेळगाव: उद्या रविवारी दिनांक ६ रोजी शिक्षक दिनाच औचित्य साधून माधवबाग शहापूर शाखा तर्फे आयोजित ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेचा विषय आहे *वाढता कोरोना संसर्ग व विविध रोगामध्ये घ्यावयाची काळजी* घरबसल्या आपल्या मोबाईल मधील *झूम एप्लीकेशन* वर कार्यशाळेचा लाभ घेऊ शकता.
मधुमेह,उच्चरक्तदाब,लठ्ठपणा, हृदयविकार हे आजार असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते, त्यामुळेच जगभरामध्ये या व्यक्ती कोरोना व इतर आजारांना सहज बळी पडत आहेत हे आपण पाहत आहोत. योग्य ती काळजी घेतल्यास हे विकार आटोक्यात ठेवणे व रोगप्रतिकारक्षमता वाढवणे सहज शक्य आहे. या एक तासाच्या कार्यक्रमामध्ये माधवबागचे तज्ञ *डॉ प्रवीण घाडेगावकर* मेडिकल हेड माधवबाग. व *डॉ प्रसाद देशपांडे* रिजनल हेड माधवबाग कर्नाटक, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम *सर्वांसाठी मोफत* असून एकंदर कोरोनाच्या या वेळी आपण आपली व कुटुंबातील लहान थोर मंडळींची कशी काळजी घ्याल याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी नाव नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर माहिती भरा. किंवा वरील दिलेल्या फोन वर फोन करून या कार्यशाळेसाठी तुम्ही सहभागी होऊ शकता संपर्क- clinic मोबाईल नंबर 8792014989