शिक्षक दिनाच्या निमित्ताने जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांचा सत्कार
आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जेष्ठ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर यांची भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गुरूची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या आशिर्वादाने आपल्या पुढील कामाची सुरुवात केली, या सुदिनी संस्थेमार्फत अध्यक्ष अॅड. नामदेव मोरे, समाजसेवक नागेश देसाई, मेडिकल रीटेलर्स जयवंत साळुंखे, उचगांव भागातील सामाजिक कार्यकर्ते पवन देसाई, राहुल पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी कागणीकर यांना जांभळाचे रोपटे, फळांची करंडी देऊन तसेच शाल घालून व (vitamin C)च्या गोळ्या देऊन छोटेखानी सत्कार केला व पुढील कामाची रुपरेषा ठरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली, यावेळी सिनेदिग्दर्शक प्रशांत पाटील, अनिता बेळगावकर, कल्लप्पा बेळगावकर व कागणीकर कुटुंबीय उपस्थित होते.