सोशल नेटवर्किंग साइटवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत विश्व हिंदू परिषद बजरंग दल विविध संघटनांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले तर बेंगलोर मध्येही विश्व हिंदू परिषद बजरंग दल विविध संघटनांनी मोर्चा काढला .
पिरणवाडी तील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचा वाद शांतपणे सोडवण्यात आला पण काही समाजकंटकांनी फेसबुक वर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक पोस्ट टाकली याचा निषेध व्यक्त करुन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह विविध हिंदू संघटनांनी आंदोलन छेडले यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सांगितले कि सोशल नेटवर्किंगवर टाकलेली ही पोस्ट निंदनीय आहे असे सांगून छत्रपती शिवरायांमुळेच आज देशात आम्ही हिंदू म्हणून मानाने जगत होत संगोळी रायन्ना यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता,देशासाठी लढले ल्या राष्ट्र पुरुषाचा अपमान करण्यासाठी लोकप्रतिनिधीच अशा प्रकारांना खतपाणी घालत आहेत राजकारण्यांनी समोरासमोर लढा द्यावा अशी छुपी कटकारस्थाने करू नयेत त्याला उत्तर देण्यासाठी हिंदू संघटना तयार आहेत आम्ही यापुढे राष्ट्र पुरुषाचा अपमान सहन करणार नाही असे प्रकार यापुढे घडल्यास सरकारने किंवा पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल करावेत कुठल्याही तक्रारदाराची वाट पाहू नये अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल कारवाई करण्यास समर्थ आहे असा इशारा दिला,
यानंतर हिंदूराष्ट्र सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बाळू कुरबुर यांनी सांगितले की आज देशात प्रत्येक ठिकाणी देशभक्तांचा अपमान करण्याचे काम सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक पोस्ट करणाऱ्यांना चपलांचा हार घालून धींड काढायला हवी या दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत सरकारला देत असल्याचे त्यांनी सांगितले