चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे . इंगळी गावात देखील पुराची पाणी घुसले आहे . लोक आपल्या गृहोपयोगी वस्तू तसेच पशुधनासह सुरक्षित स्थळी स्थलांतर करीत आहेत .
इंगळी गावातील लोकांना बोटीमार्फत सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे . आज सकाळपासूनच पुराची खबरदारी घेत तालुका प्रशासनाने तीव्र दुर्लक्ष केले होते . ही बातमी माध्यमांतून प्रसारित होताच तहसीलदार सुभाष संपगावी यांनी स्वतः
इंगळी गावातील लोकांचे स्थलांतर करण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी बोटीची व्यवस्था केली आहे . यासंबंधी रमेश मुरचाटे यांनी सांगितले कि हुक्केरीनी दिलेल्या बोटीतून आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे . तालुका प्रशासनाने आमची काहीही व्यवस्था केली नाही अशी नाराजी व्यक्त केली .