आणि ‘मार्मिक’कार बाळासाहेब ठाकरे ‘शिवसेनाप्रमुख’ झाले” शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. त्यातल्या व्यंगचित्रांनी इतिहास घडवला. ही आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली. बाळासाहेब ठाकरेंना मार्मिककार म्हटलं जाई..ते शिवसेनाप्रमुख कसे झाले त्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली. मार्मिक या साप्ताहिकाचा हिरक महोत्सव मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची ही आठवण सांगितली.