vob news 27/09/2023
वीरभद्र नगर बेळगाव मधील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविल गेल आहे. आयत ने फ्रुट्स, वाहने, शरीराचे अवयव, इलेक्ट्रिकल वस्तू, प्राणी, पक्षी, वैद्यकीय उपकरण यांची ओळख पटवून आपली एक नवीन ओळख बनविले आहे. या पाठीमागे आयत च्या मातापित्याने मुलीला मोबाईल पासून दूर ठेवून पुस्तकावर जास्त भर दिला. आयत हिला तिची माता रोज पुस्तकांमधील चित्रांची ओळख करून देत. आज त्यांच्या या प्रयत्नाला यश संपादन झाले. इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये आपल्या बेळगावचे नाव या चिमुकलीने रोशन केले आहे. त्याबद्दल आयात हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.