संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते 'आरोग्यदूत'चे लोकार्पण* दिव्यांग बांधवांच्या साक्षीने झाला प्रकाशन सोहळा*
वॉइस ऑफ बेळगांव न्यूज़ - ठाणे : आरोग्य विषयाला वाहिलेल्या 'आरोग्यदूत' या मासिकाच्या पहिल्या अंकाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. टेंभीनाका-ठाणे येथील बी.जे.हायस्कूलच्या प्रांगणात दिव्यांग बांधवांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री सचिवालयाचे ओएसडी मंगेशजी चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत, 'आरोग्यदूत'चे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, व्यवस्थापकीय संपादक भगीरथ तोडकरी उपस्तीत होते.
सकारात्मक पत्रकारितेचा गौरव
'आरोग्यदूत'च्या माध्यमातून संपादक बाबा श्रीहरी देशमाने यांनी सकारात्मक आणि विधायक पत्रकारितेला प्राधान्य दिले आहे. देशमाने यांच्या पत्रकारितेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांतजी शिंदे, मुख्यमंत्री सचिवालयाचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी कौतुक केले. याप्रसंगी संपादक बाबा श्रीहरी देशमाने आणि व्यवस्थापकीय संपादक भगीरथ तोडकरी यांनी आपली भूमिका मांडली.