ट्रान्समिशन लाईनबद्दल समाजात काही वर्षांआधी गैरसमज होते." ग्रीन एनर्जी कॉरिडॉर "
, पॉवर लाईन्स राज्यहिताला पूरक आणि पोषक ठरणाऱ्या असल्या तरी काही लोकांच्या गैरसमजांमुळे या लाभदायी प्रकल्पाकडे बळीराजा कानाडोळा करताना दिसत होता. काही उपद्व्यापी लोक पॉवर लाईन्स, शेती शिवारातील पिकांना बाधक असल्याचे सांगत वैचारिक प्रदूषण पसरवून या ट्रान्समिशन लाईनबद्दल गैरसमज पसरविताना दिसत होते..पण, आज बळीराजा अभ्यासू, प्रगतशील, सजग आणि शहाणा झाला आहे. स्वस्त हिरवे नायट्रोजन, हायड्रोजन आणि इतर ऊर्जा उत्पादीत करणाऱ्या ईतर पर्यायी स्रोतांपासून अक्षय ऊर्जा उत्पादित करणे देशासाठी अत्यावश्यक बनले आहे.असे करून भारताने ऊर्जा निव्वळ निर्यातदार बनण्याची गरज आहे, असे आजच्या प्रगतशील शेतकऱ्यांचे म्हणणे दिसून येते.शिवाय सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये राज्याचे स्थान देशात बळकट होणे गरजेचे आहे, असेही काहींचे म्हणणे दिसते.यामुळे " ग्रीन एनर्जी कॉरिडॉर ", पॉवर लाईन्स प्रकल्पाला बहुसंख्य शेतकरी बांधवांकडून हिरवा कंदील दाखविला जाताना दिसतो. ट्रान्समिशन लाईनकरिता उभारण्यात येणाऱ्या टॉवर परिसरातील पिकांवर विपरीत परिणाम होतो, असे नाही.याखालील जमिनीवर जोंधळा, मका, भात, ऊस इतकेच नव्हे तर कडधान्य आणि भाजीपाला आदी पिकेही घेता येतात आणि ही पिकं जोमाने येतात, हे टिपलेल्या छायाचित्रावरून दिसून येते.