हुबळी कर्नाटक के एल इ आंतरराज्य मॅरेथॉन स्पर्धेत तोपिनकट्टी खानापूर वेदांत होसुरकर व कल्लाप्पा तिरवीर यांचे सुयश हुबळी के एल इ अमृत महोत्सवानिमित्त हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 22.01.2023 रोजी स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये 14 वर्षाखालील गटामध्ये 6000मी कुमार वेदांत रामचंद्र होसुरकर शाळा तोपिनकट्टी याने प्रथम क्रमांक संपादन केला तर श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तीरवीर तोपिनकट्टी
खानापूर यांनी 41.60 वयोमानातील गटामध्ये 16000मी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला वरील अंतर 1.05 तास वेळेत पूर्ण केले या दोन्ही तोपीनकट्टी सुपत्रांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुला. मुलींच्या करता 6000मी 18 वर्षाखाली महिला व पुरुष गटाकरिता 16000मी19.ते40 वय महिला व पुरुष गटाकरिता16000मी आणि, 41.60 वय गटाकरिता 16000मी असे धावण्याचे अंतर ठेवले होते या स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शटर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये महिला व पुरुष संपूर्ण कर्नाटकराज्यातून 5000 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता बेळगाव जिल्ह्यातून 2000 पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता श्री कल्लप्पा तीरवीर यांनी राज्य व देश विदेशात, 150 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक सुवर्णपदके संपादन केली आहे जिद्द व चिकाटी व स्वयंप्रेरणा 52 वर्षे वय असताना, दररोज मेहनत घेऊन सातत्याने पराक्रम नोंदविले आहेत यांना प्रशिक्षक श्रीसुभाष पवार श्री एजी पाटील सर गर्लगुंजी आणि श्री एल जी कोलेकर सर गर्लगुंजी आणि विश्वभारती कला क्रीडा प्रतिष्ठान जिल्हा बेळगाव व महालक्ष्मी ग्रुप पदाधिकारी श्री यल्लाप्पा तिरविर तोपिनकट्टी यांचे सहकार्य लाभत आहे कुमार वेदांत रामचंद्र होसुरकर तोपिनकट्टी शाळेचा विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ यांचे प्रोत्साहन व वडील श्री रामचंद्र होसुरकर शारीरिक शिक्षक महालक्ष्मी हायस्कूल तोपिणकट्टी यांचे प्रशिक्षण लाभत आहे या दोन्ही गोल्ड मेडलिस्ट स्पर्धकांचे सर्व ठिकाणाहून गौरव व अभिनंदन होत आहे