पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; कर्नाटकात SPG चा घेरा तोडून तरुण गाडीजवळ पोहचला
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका यावर्षी पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (12 जानेवारी) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेची मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी रोड शो करत असताना एका तरुणाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण, तेवढ्यात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) च्या सुरक्षारक्षकाने तत्काळ त्या तरुणाला तेथून बाजूला केलं आहे. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत होते. तेव्हा एक तरुण रस्त्याच्या कडेला हार घेऊन उभा होता. पंतप्रधान मोदी कारच्या दरवाज्यात उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. तेवढ्यात सुरक्षा भेदून तरुणाने पंतप्रधानांना हार घालण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षा रक्षकांनी तातडीने तरुणाला बाजूला केलं. मात्र, तरुणाने दिलेला हार पंतप्रधान मोदींनी घेतला.