गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याणात अटक ; १०० किलो गांजा जप्त
मुंबई प्रतिनिधी ; हेमंत एच आर
गुजरातच्या मोठा गांजा तस्कराला कल्याण मध्ये अटक... गांज्याची किंमत 15 लाख रुपये...
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचून शंभर किलो गाजा जप्त करुन गांजीची तस्करी करणा:या विजय कुमार पटेल याला अटक केली आहे. विजयकुमार हा गुजरातचा मोठा गांजा तस्कर आहे असे बोलले जात आहे. गुजरातहून तो त्याच्या क्वालीस गाडीने गांजा कल्याणला घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसानी मिळाली होती. त्या आधारे गुरुवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. या आधी गांज्या प्रकरणी अनेकांना अटक झाली आहे. मात्र गांजाची तस्करीवर काही परिमाण झालेला नाही. विजयकुमार हा कल्याणमध्ये कोणाला गांजा देण्यासाठी आला होता. याचा तपास पोलिस करीत आहे. या गांज्याची किंमत जवळपास 15 लाख आहे.