Website Visitor: counter free Social Connect
  • English
  • हिंदी
  • ಕನ್ನಡ
  • मराठी
Breaking
Breaking News राज्य रोलर स्केटिंगमध्ये स्पर्ध्येत बेळगावचे स्केटर चमकले* 
Breaking News वीरभद्र नगर बेळगाव मधील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
Breaking News श्रींगारी कॉलनी संघ गणेश उत्सव 2023 गणपती मंडपची मुहूर्त मेढ*
Show Menu
  • Home
  • Breaking News
  • Politics
  • Entertainment
  • Sports
  • Business
  • Education
  • More
    • Food
    • Lifestyle
    • Travel
    • Movies
    • News
    • Hedline
  • District
    • Athni
    • Bangalore Rural
    • Bangalore Urban
    • Belgaum
    • Bengaluru
    • Bijapur
    • Chikodi
    • Dharwad
    • Gokak
    • Karwar
    • Koppal
    • Mandya
    • States
      • Maharashtra
      • Goa
      • Punjab
      • Delhi
      • Karnataka

शेतकरी आंदोलन : संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या


Dec 17th, 2020

शेतकरी आंदोलन : संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

त्यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटनुसार संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते आणि ते हरयाणा एसजीपीसीचे नेतेदेखील होते.

मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे," असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.
कोणीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काही केलं नाही. अनेकांनी त्यांना मिळालेले सन्मान परत केले. हा अत्याचाराविरोधातील आवाज आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह," असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी मंगळवारीदेखील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशीरा पटियाला जिल्ह्याच्या सफेद गावात एक अपघात झाला होता. त्यामध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून परतत असेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.




  • Home
  • About
  • Privacy & Terms
  • Advertisement
  • Contact

© 2023 Voice of Belgaum. All Rights Reserved.