भाऊबीजेच्या दिवशी गोव्यातील दोन सख्ख्या बहिणींची क्रुर हत्या
भाऊबीजेच्या दिवशी गोव्यातील म्हापसा येथे दोन सख्ख्या बहिणींची कोयत्याने क्रुरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालमत्ता आणि घरगुती वादातून दोन सख्खा बहिणींची भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हत्या करण्यात आलीआहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मार्ता लोबो (६४) आणि वीरा लोबो (६२) असे मृत महिलांची नावे आहेत.
ही घटना १५ नोव्हेंबरला रात्री ९.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी रोविना लोबो (२९) आणि सुबहान राजाबली (२०) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.