येडीयुरप्पा लवकरच पायउतार,पुढचा सी.एम.उत्तर कर्नाटकातून : बसवराज पाटील यतनाळ
बंगळुरु - कर्नाटकमधील भाजपाचे आमदार बसनगौडा यतनाळ यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत राज्यात मुख्यमंत्री बदलासाठी आघाडी उघडली आहे. राज्यातील विजापूर विधानसभा मतदार संघाचे आम.बसवराज पाटील यतनाळ यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा त्यांनी केला आहे. येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे. यतनाल म्हणाले, राज्याचे बहुतेक वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर खूश नसल्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलले जातील, पुढचे मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचे असतील असं पीएम मोदींनीही म्हटलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे असा दावा यतनाळ यांनी केला.