ट्रॅक्टर मोटारसायकल अपघातात पती,पत्नीसह पाच महिन्याचे बाळ ठार
ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.ठार झालेल्यात पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील संगनकेरी क्रॉस येथे हा अपघात घडला.मोटरसायकल वरून पती,पत्नी आणि पाच महिन्याचे बाळ जात होते.त्यावेळी ट्रॅक्टरच्या धडकेने पती,पत्नी आणि पाच महिन्याच्या बाळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातातील मृत व्यक्ती हिडकल गावच्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.अपघाताचे वृत्त कळताच घटप्रभा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.घटप्रभा पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.