विजापूर इंडी तालुक्यातील हिंगणी गावच्या ११० वर्षांच्या वृद्धेची पुरातून सुखरुप सुटका
भीमा किनाऱ्यावर पूर आला आहे . या पुरामुळे घरातच अडकून पडलेल्या ११० वर्षांच्या वृद्धेसह तिच्या मुलाला सुखरूप वाचवण्यात आले . ही घटना विजापूर जिल्हयातील इंडी तालुक्यातील हिंगणी गावात घडली आहे .
हिंगणे गावातील शिवमल्लाप्पा आणि त्याची ११० वर्षांची वृद्ध आई , पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते . याची माहिती मिळताच , स्थानिक अधिकारी आणि स्थानिकांनी आज शिवमल्लापा आणि त्याच्या आईची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली .